डोंबिवली : एका तरुणाने मोबाईलच्या दुकानातून मोबाईलची चोरी केल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. डोंबिवलीच्या पूर्व भागातातील नमस्ते टेलीकॉम या मोबाईलच्या दूकानातून मोबाईल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या युवकाने ही चोरी केली.
मोबाईल पाहण्यासाठी त्याने मोबाईल हातात घेतला आणि फोनवर बोलण्याचा बहाणा करून हा युवक दुकानदाराची नजर चुकवून धूम ठोकून पसार झाला. मात्र, CCTV मध्ये हा चोरीचा प्रकार कैद झाला आहे. यात या तरुणाचा चेहराही स्पष्ट दिसत असून महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेबाबत पोलीस गंभीर नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण, ही घटना घडूनही अद्यापी रामनगर पोलीस या चोराचा शोध घेऊ शकलेले नाहीत, त्यामुळे खरचं पोलीस तपासाबाबत गंभीर आहेत का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.