मुंबईत उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा

विलेपार्ले परिसरात उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा झाल्याचे पुढे आलेय. दरम्यान, मुलांच्या आईनेच त्यांना विष पाजल्याचा आरोप मुलांच्या वडिलांनी केलाय. 

Updated: Apr 2, 2016, 11:30 AM IST
मुंबईत उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा title=

मुंबई : विलेपार्ले परिसरात उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा झाल्याचे पुढे आलेय. दरम्यान, मुलांच्या आईनेच त्यांना विष पाजल्याचा आरोप मुलांच्या वडिलांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. पोलिसांकडून याची चौकशी सुरु आहे.

उसाचा रस घेतल्याने तब्येत बिघडली

या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी मुलांच्या आईला शुक्रवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विलेपार्ले येथील जुहू गल्लीमधील हुसैन चाळीत फारुख शेख हे बारा, आठ आणि सहा वर्षांच्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. फारुख यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शाहीन ही हुसैन यांच्या घराजवळ आली. तिने या तिन्ही मुलांना उसाचा रस पिण्यासाठी स्वत:सोबत नेले. त्या वेळी मोठया मुलाने दोन ग्लास उसाचा रस प्यायला; तर उर्वरित दोघांना उसाचा रस कडू लागल्याने त्यांनी तो अर्धवटच टाकला. उसाचा रस प्यायल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

तिघा मुलांच्या पोटात आढळलेला पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. तिन्ही मुलांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र त्यात साम्य आढळलेले नाही. महिलेची चौकशी केली असता मी संबंधित ठिकाणी गेली नाही, असे तिचे म्हणणे आहे. आम्ही या प्रकरणी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत आहोत. शिवाय प्रयोगशाळेच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत. या सगळ्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

काय आहे हा प्रकार?

दरम्यान, या महिलेने प्रियकराच्या सोबतीने पोटच्या तीन मुलांना ऊसाच्या रसातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला, बोलले जात आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

या महिलेचे एका परपुरूषाशी प्रेमसंबंध होते. सात महिन्यांपूर्वी आरोपी महिलेचा तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत राहत होती. तर तिची तिन्ही मुले तिच्या पतीसोबत राहतात. काल रात्री ही महिला मुलांना भेटायला आणि त्यांना ऊसाचा रस पाजला. त्यानंतर मुलांना त्रास होऊ लागला. मुलांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, यातील एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याची सांगण्यात येत आहे.