मुंबई : लहान वाहनांसाठी सरकारकडून टोलमुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या वाहनांच्या टोलमध्ये मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यात एसटीबसला टोलमुक्ती मिळाल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण वाहिनीला दिलासा मिळणार आहे. 'सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम टोलमुक्ती करू,' अशी घोषणा केलेल्या शिवसेना-भाजपने सत्ता संपादन केल्यावर याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरवात केली आहे.
राज्याचे नवीन टोल धोरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यात राज्यातील सुमारे ३० लाख छोट्या चारचाकी वाहनांना "टोलमुक्ती' मिळणार आहे.
राज्यात सार्वजनिक बांधकाम खाते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी रस्त्यांची कामे केली आहेत. यातील काही कामे बांधा, वापरा आणि हस्तांतर (बीओटी) तत्त्वावर करण्यात आली.
ही कामे करताना विकसकांना टोलवसुलीचे अधिकार देण्यात आले. मात्र टोलवसुली अन्यायकारक असल्याने जनतेत फार मोठा असंतोष निर्माण झाला.
छोट्या चारचाकी वाहनांना दिलासा देताना टोलवसुलीधारकांचा आर्थिक भुर्दंड भरून काढण्यासाठी मालवाहतूक, जड वाहनांच्या टोलआकारणीत किमान वीस टक्के वाढ करण्याचे संकेत मिळत आहेत.
हे धोरण सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सरकारकडून जाहीर केले जाणार असल्याचे समजते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.