मुंबई : टोल नाक्यांवर आता टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या टोल नाक्यांवरही ही वसुली सुरु झालीय. या टोल नाक्यांवर खास टोल अनाऊंसिंग मशीनही लावण्यात आली आहे. यामध्ये जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा चालणार नाहीत. त्याचप्रमाणे सुट्टे पैसे ठेवण्याचं आवाहनही करण्यात येतंय. तर पुन्हा टोल सुरु झाल्यानं नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
नोट बंदीच्या निर्णय घेतल्यानंतर तीन आठवड्यानंतर टोल नाक्यावर टोल घेण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. मुबंईचा एन्ट्री पॉईंट असलेल्या दहिसर टोल नाक्यावर वाहन चालकानं लांबचलांब रांगा लागल्या दिसून येतायत. मात्र, सुट्टे पैसे नसल्यामुळे टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची होतानाचं चित्र दिसतंय. त्यात टोल नाक्यावर स्वाईप नशीन कार्यान्वित नाहीत. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असूनही वाहन चालकांना कार्ड स्वॅप करता येत नाही.
रात्रीं पासून टोल वसुली करण्यास सुरुवात झाली. मात्र, सुट्ट्या पैशांवरून टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये किरकोळ वाद होताना दिसून आले. त्यात ई-पेमेन्टची सुविधा नसलेल्यामुळे वाहन चालकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करता आला नाही. एवढ नाही तर वाहनांची रांग जर 100 मीटर अंतरावर पोहचली. तर टोल कर्मचा-यांना वाहनं फुकटात सोडावे लागतील. त्यामूळे टोल नाक्यावरील गर्दी नियंत्रणात ठेवण्याचं आव्हान टोल कर्मचा-यांसमोर येणार आहे.
लोणावळ्यातल्या टोल नाक्यावर पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातायत. सध्यातरी इथे अजुन काही गोँधळ झालेला नाहीये. पण सुट्ट्या पैशांची मात्र चणचण जाणवतेय. यावरह उपाय शोधण्यात आलाय. कार्ड स्वाईप मशीनही टोल नाक्यावर ठेवण्यात आलं. हा उपाय जर इतरी टोल नाक्यांवर उपलब्ध करून दिला गेला तर निश्चितच वाद टळतील.