पारदर्शकतेच्या आरोपांवर निकालानंतर पांघरूण घालतील का?

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेवर प्रचारादरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप केले

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2017, 07:35 PM IST
पारदर्शकतेच्या आरोपांवर निकालानंतर पांघरूण घालतील का? title=

मुंबई : भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेवर प्रचारादरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप केले, यात भाजप नेते किरीट सोमय्या आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते.

कारभारातील पारदर्शकतेच्या मुद्यावर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती होवू शकली नसल्याचं भाजपने म्हटलं होतं.

निवडणुकीदरम्यान शिवसेनेने भाजपच्या आरोपांना उत्तर देखील दिली, या काळात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना हिंमत असेल तर संपत्ती जाहीर करा, असं आव्हान देखील दिलं होतं. यानंतर शिवसेनेने देखील भाजपावर आरोप केले होते.

मात्र मतदानानंतर शिवसेना आणि भाजप यांचा आकडा जवळपास सारखाच असणार आहे, म्हणून पुन्हा उभय पक्षाकडून पुन्हा युती होण्याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. यावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची पारदर्शकता मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार आहे.

शिवसेना आणि भाजपचं राज्यात युतीचं सरकार आहे, जर शिवसेनेचा कारभार पारदर्शक नाही, असं भाजप नेत्यांनी जनतेला जाहीर सभांमधून सांगितलं आहे, तर सत्तेसाठी पुन्हा भाजप-शिवसेना पारदर्शकतेवर पांघरून घालून जवळ येतील का हा प्रश्न मुंबईकरांना नक्कीच पडेल.