www.24taas.com,मुंबई
२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, शहीद झालेले पोलीस आणि जवानांना आज मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच देशातही श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईवरील हल्ल्याला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदीनी शहीद स्मारक येथील कार्यक्रमात श्रद्धांजली वाहिली.
या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती अजून ताज्या आहेत. देशात आणि मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अजमल कसाबला नुकतीच पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्यामुळे आज आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेय.