मुंबई : उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय. राज्य सरकारनं सरकारी रुग्णालयांमध्ये हीट वेव्ह थेरपी सुरू केली.
यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच तापमान बदलामुळं स्वाईन फ्लूचंही प्रमाण वाढल्याचं सावंत यांनी सांगितलं.
सकाळी १८ ते १९ डिग्री तापमान असलं. मात्र नंतर जास्त तापमान वाढत असल्याचं निदर्शनास आलंय. रविवारी पुण्यात जाऊन आढावा घेतला असून यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.