मुंबई : गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मंगळवारी २२ डिसेंबर रोजी टू सीट्सची लोकल चालवण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात डोंबिवलीच्या भावेश नकाते या तरुणाला गर्दीमुळे लोकल प्रवासादरम्यान जीव गमवावा लागला. त्यानंतरही अशाच या घटनेनंतर सर्वच स्तरातून रेल्वे प्रशासनावर टीका झाली. या प्रकरणाची दखल घेताना रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेमार्गावर ही लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय.
लोकलच्या डब्यांमध्ये बदल करुन प्रयोगतत्वावर एक गाडी चालवण्यात येणार आहे. तूर्तास तरी या मार्गावर केवळ एकच गाडी चालवण्यात येणार आहे.