मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मंदिर वही बनायेंगे, तारिख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली.

Updated: Oct 23, 2015, 09:16 AM IST
मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा title=

मुंबई: शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज उद्धव ठाकरेंच्या रडारवर भाजप असेल असं वाटत होतं. पण थेट त्यांनी भाजपवर टीका केली नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण रोख हा महागाई आणि पाकिस्तान या दोन मुद्द्यांवर होता. काही बाबतीत ठाकरी शब्दात त्यांनी भाजपला इशारा मात्र दिलाय.

सुरूवातीलाच शत्रूचं आणि मित्राचं लक्ष असलेला हा पहिलाच दसरा मेळावा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मंदिर वही बनायेंगे, तारिख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, आम्ही सोबत आहोत, अशी मागणीही त्यांनी केली. 

 

LIVE- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं शिवतीर्थावर आगमन

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करून भाषणाला सुरूवात
  • शत्रूचं आणि मित्राचं लक्ष असलेला पहिलाच मेळावा
  • मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा
  • आमची बांधिलकी जनतेशी, सत्तेशी नाही - उद्धव ठाकरे
  • संसार मोडण्याची शिवसेनेची आदत नाही, या शब्दात युती न तुटण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत
  • पटत नाही तर बाहेर पडा हा सल्ला नको, आमचं आम्ही पाहू
  • महागाईवर चर्चा व्हावी, सेनेच्या मंत्र्यांचा उपयोग करून घ्या - उद्धव ठाकरे
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी
  • सत्तेत आहोत तर काम करु द्या, किती काळ राहायचं हे आम्ही ठरवू 
  • शाहीर अमरशेख यांच्या जन्मशताब्दीविषयी कोणालाही माहिती नाही, हे दुर्दैव
  • औरंगाबादच्या नामांतरावर उद्धव ठाकरेंचं भाष्य... औरंगाबादचं नाव संभाजी नगरच
  • अब्दुल हमीद मुसलमान असला तरी आमचा बंधू - उद्धव ठाकरे 
  • याकूबच्या फाशीबद्दल एव्हढी चर्चा का? एवढा पुळका का? दाभोलकर, पानसरेंच्या हत्येबाबत इतका पुळका का नाही?
  • साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितचा कोर्टात सडवत ठेवलंय, पहिले गुन्हा सिद्ध करा, मग फासावर लटकवा, आम्ही विरोध करणार नाही
  • शरद पवार हिंदूच्या बाजूनंही विचार करा... उद्धव ठाकरे पवारांवर बरसले
  • सोनिया गांधींची लाचारी पत्करुन सत्ता उपभोगणाऱ्या शरद पवारांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये - उद्धव ठाकरे 
  • हिंदूत्ववाद्यांवरच संशय का? साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित निर्दोष असले तर, त्यांच्या इतक्या वर्षांच्या तुरुंगवासाचं काय?
  • पाकिस्तानने ईदची मिठाई नाकारली, पाकिस्तान भारताशी कसा वागतो हे सगळे विसरतात - उद्धव ठाकरे
  • पुस्तकात शाई होती, शाईचं उत्तर आम्ही शाईनेच दिलं - उद्धव ठाकरे 
  • मनोहर यांना लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं, एक थेंबही रक्त सांडलं नाही- उद्धव ठाकरे 
  • शिवसेनेला अतिरेकी घोषित करा म्हणतात, औवेसी बरळतो त्याचं काय?
  • दादरी हत्याकांडामुळं देशाची मान खाली, हरियाणा जळीत कांड दु:खद
  • भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, आम्ही सोबत आहोत - उद्धव ठाकरे
  • पहिले डाळीला संरक्षण द्या, मग पाकड्यांना- उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
  • राज्याच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखविन, उद्धव ठाकरेंचा इशारा
  • मला वाद नकोय, अरे ला कारे करू नका... मी बघिन काय करायचं, रामदास कदमांना सल्ला

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.