नाराज राजू शेट्टींना आपलसं करण्याचे सेनेचे प्रयत्न

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Updated: Jan 16, 2015, 03:58 PM IST
नाराज राजू शेट्टींना आपलसं करण्याचे सेनेचे प्रयत्न title=

मुंबई : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

ऊस दराच्या आंदोलनासाठी राजू शेट्टींनी आधीच सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. त्यात मंत्रिमंडळात सामावून न घेतल्यानं राजू शेट्टी नाराज आहेत. तसंच, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत यापुढं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार नसल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. 

त्यामुळं भाजपवर कुरघोडी करण्याची संधी साधत नाराज शेट्टींना पुन्हा जवळ करण्याचा शिवसनेनं प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातंय.  

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उद्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहेत. ऊसाच्या 'एफआरपी'चा प्रश्न मार्गी लागावा यासाठी, मुख्यमंत्री केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करणार आहेत. तसंच, राज्यातलं सर्वपक्षीय शिष्टमंडळही 'एफआरपी'च्याच मुद्यावर उद्या अरुण जेटलींची भेट घेणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.