मेरे मन को भाया... मै कुत्ता काटके खाया

 मेरे मन को भाया... मै कुत्ता काटके खाया... हा 'चायना गेट' चित्रपटातील डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. पण असं प्रत्यक्षात ते सुद्धा मुंबईत कोणी करेल यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना पण असं मुंबईत घडलं आहे. 

Updated: Jan 16, 2015, 02:22 PM IST
मेरे मन को भाया... मै कुत्ता काटके खाया  title=

मुंबई :  मेरे मन को भाया... मै कुत्ता काटके खाया... हा 'चायना गेट' चित्रपटातील डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. पण असं प्रत्यक्षात ते सुद्धा मुंबईत कोणी करेल यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना पण असं मुंबईत घडलं आहे. 

दोन मणीपुरी तरुणांनी एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना वाकोल्यात घडली आहे. दोघांनी परिसरातील एक लॅब्रेडोर कुत्रा गायब केला त्यानंतर त्या कुत्र्याची हत्या करून त्याला फस्त केले. राहत्या घरात कुत्र्याच्या मटणावर ताव मारणाऱ्या या दोघांना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. 

कलिना येथे राहणाऱ्या संतोष शेट्टी यांचा हा लॅब्रेडोर कुत्रा गेल्या दोन दिवसांपासून गायब झाला होता. त्याचा त्यांनी खूप शोध घेतला पण न सापडल्याने त्यांनी वाकोला पोलिसांमध्ये तक्रार दिली. दरम्यान, शेट्टी याचा कुत्रा याच परिसरातील दोन मणीपुरी तरूण घेऊन जाताना नागरिकांनी पाहिले होते. त्यानुसार पोलिसांनी मणीपुरी तरूणांच्या घरी धडक दिली असता कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा सापडला. तो पट्टा शेट्टी यांच्याच कुत्र्याचा होता. 

त्यानंतर लालोराणी उर्फ नोना (२७) आणि मिशांग उर्फ खोखो (२०) या दोघा तरूणांना कलम ३७९, ४२९ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. नोना आणि खोखो हे मूळचे इन्फाळचे असून ते कुत्र्याचे मटण खातात. दोघांनी शेट्टी यांचा कुत्रा फस्त केला. कचऱ्यात कुत्र्याची हाडेही सापडलीत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.