मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोरीवली आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विविध शाखांना भेट दिली. दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शाखांना भेट देणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले होते.
त्यानुसार प्रभाग क्रमांक 11,13 ,14 15 ,24 आणि 25 या शाखांना उद्धव यांनी भेट दिलीय.. यावेळी शाखाप्रमुख ,गटप्रमुख ,महिलागटप्रमुख, यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांशी उद्धव यांनी संवाद साधला. आगामी पालिका निवडणुकांची तयारीचा त्यांनी आढावा घेतला.