नवी दिल्ली: शिवसेनेनं तात्विक विषयांवर चर्चा होणं गरजेचं होतं. पद, खाती या विषयांवर चर्चा अपेक्षित नव्हती असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेनेनं विश्वास ठेवायला हवा होता असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शपथविधी सोहळ्याचं पंतप्रधानांचं निमंत्रण शिवसेनेनं नाकारणं दुर्दैवी होतं आणि त्यामुळं दुःख झाल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिलीय.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा शिवसेना घेणार असेल तर आम्ही विरोधातच बसणं पसंत करू अशी स्पष्ट भूमिका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. सत्तेसाठी आम्ही लाचार नाही.. कोणताही अपमान सहन करून आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही.. अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केली.
येत्या ४८ तासांत भाजपनं राष्ट्रवादीच्या पाठींब्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, हिंदूत्ववादी मतं फुटू नयेत अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले. आज संपूर्ण दिवसभराच्या प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेच्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक सेनाभवनात झाली. त्यानंतर शिवसेनेची ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.