नायडूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

केंद्रीय शहरविकासमंत्री व्यैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये आज पुणे मेट्रो आणि मुंबई मेट्रो-2 बाबत जवळपास एक तास चर्चा झाली.

Updated: Aug 22, 2014, 02:19 PM IST
नायडूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न  title=

मुंबई : केंद्रीय शहरविकासमंत्री व्यैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये आज पुणे मेट्रो आणि मुंबई मेट्रो-2 बाबत जवळपास एक तास चर्चा झाली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्याबाबत दोघांनी चर्चा केली. याशिवाय, स्मार्ट सिटीमुळे राज्यातील किती शहरांना फायदा होईल याबाबतही दोघांमध्ये बातचीत झाली.

आज सकाळीच केंद्रीय शहरविकासमंत्री आणि भाजप नेते व्यंकय्या नायडू मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर दाखल झाले. ‘ब्रेकफास्टटच्या निमित्तानं त्यांची ही भेट आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुंबईच्या भाजप-सेना खासदारांनी व्यैंकय्या नायडू यांची भेट घेऊन मुंबई मेट्रो टू प्रोजेक्टबाबत माहिती दिली तर ठाण्यातही मेट्रोची आवश्यकता असून नवीन रेल्वे स्टेशनसाठी जमीन, पाणी, प्रकल्पासाठीचा निधी आणि वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या मंजूरीबाबत ठाण्यातल्या खासरादांनी नायडूंकडे मागणी केलीय.

दरम्यान, नायडू यांनी रात्री एअरपोर्ट ते घाटकोपर असा मेट्रो रेल्वेनं प्रवास केला. लवकरच ‘मुंबई मेट्रो-3’ चं भूमीपूजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.