मुंबई: मुंबईत पोलिसांची मान शरमेनं खाली घालणारी घटना समोर आलीय. एका महिलेला चोरीच्या आरोपात चुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून महिला अधिकाऱ्यांनी बेदम मारलं. इतकंच नाही तर पुरुष पोलिसांनीही तिला थर्ड डिग्री देत बेदम मारहाण केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.
चेंबूरच्या सिंधी कॉलनीत एका घरात ३ लाखांची चोरी झाली. या चोरीच्या पार्श्वभूमीवर त्या घरात काम करणारी महिला गीता मोरे हिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. दुपारी २ वाजता या महिलेला आणून तिला रात्री ८ पर्यंत बेदम मारल्याने तिची तब्येत खराब झाली. तेव्हा पोलिसांनी तिला घरी पाठवलं.
या महिलेचे नातेवाईक याबाबत पोलीस स्टेशनला विचारणा करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना दम भरला.
पाहा हा धक्कादायक व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.