www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विक्रांत जहाजाचं म्युझियमही शक्य नाही आणि त्यावर हेलिपॅडही उभारता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विक्रांतचा लिलाव होणं आता निश्चित झालंय. कारण दोन्ही गोष्टी अव्यवहार्य. हेलिपॅड व्हावं, अशी उद्योगपतींची मागणी. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी साऊथ मुंबईत हेलिपॅ़ड होईल. नौदलाचा विरोध सुरक्षेच्या दृष्टीनं आहे. हेलिपॅडचा रस संपल्यानंतर विक्रांतमध्येही रस उरला नाही.
एकेकाळी नौदलाची शान असलेलं विक्रांत वाचवणं महत्त्वाचं होतं.. विक्रांतवर म्युझियम होत असेल, तर त्यावर हेलिपॅडही उभारावं, अशी काही उद्योग जगताची मागणी होती. त्यानिमित्तानं दक्षिण मुंबईत लँडिंगसाठी हेलिपॅडही उपलब्ध झालं असतं.. पण नौदलानं सुरक्षेच्या कारणावरुन हेलिपॅडला नकार दिला. नंतर सरकारलाही विक्रांतचं म्युझियम करण्यात काही स्वारस्य उरलं नाही.
उद्योगपतींसाठी हेलिपॅड होणार असेल तर विक्रांत महत्त्वाचं, अन्यथा विक्रांतला जपण्यात सरकारला स्वारस्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय. पण एकंदरीत या सगळ्या गोंधळात एकेकाळी नौदलाची शान असलेल्या विक्रांतची अखेर दुर्दैवीच होणार, हे जवळजवळ स्पष्ट झालंय.
मुख्यमंत्र्यांनी विक्रांतवर हेलिपॅड उभारता येणार नाही असंही यावेळी वक्तव्य केलं. मात्र विक्रांतवर हेलिपॅड तयार करायला नौदलाचा विरोध असल्यामुळे उद्योगपतींच्या दबावाखाली असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय असा प्रश्न उपस्थित होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ