मुंबई : मुंबईतली एक ओली बाळंतीण आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन मतदानाला आली होती. तान्ह्युल्याकडे बघायला घरी कोणी नव्हतं.
मात्र म्हणून कृष्णा मिश्रा घरी बसल्या नाहीत, तर आपल्या बाळाला घेऊन मतदानाला आल्या. छोट्या बाळाला घेऊन रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं.
मुंबई
दिव्यांग असलेल्या रुबिना शेख आणि अंध असलेल्या सुमन साळूंखे या दोन मुंबईकर महिलांनी आपण आदर्श मतदार आहोत हे दाखवून दिलंय. रुबिना, सुमन यांच्यासारख्या मतदारांमुळे लोकशाहीचे हात अधिक बळकट होत आहेत.
रत्नागिरी
रत्नागिरीच्या पानवल गावातल्या महेश मांडवकरचं लग्न साडे नऊच्या मुहूर्तावर लागणार होतं, त्याआधी त्यानं व-हाडी मंडळींसह मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.