मुंबई : मुंबईमध्ये लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चर्चगेट फास्ट लोकलमध्ये दारु प्यायलानंतर एक तरुण महिलांच्या डब्यामध्ये घुसला होता. या तरुणानं महिलांची छेड काढली, तसंच त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला.
यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी या तरुणाला चांगलाच चोप दिला, आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं.
या प्रकारामुळे अंधेरी स्टेशनवर बराच वेळ लोकल थांबवण्यात आली होती. लोकलमध्ये महिलांच्या डब्यात पोलीस नसतात अशी अनेक महिला प्रवाशांची तक्रार आहे.
महिलांची छेडछाड करणे, हातातील मोबाईल हिसकावून घेणे, महिलांच्या पर्स हिसकावणं असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यावर रेल्वे पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.