www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत आज संध्याकाळी होणाऱ्या शिवसेना-भाजपच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज झालेत.
‘असाच अपमान होत राहिला तर महायुतीबाबत फेरविचार करावा लागेल’, असा अल्टिमेटम आरपीआय आठवले गटाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिलाय. खरंतर, बैठकीला निमंत्रण मिळावं यासाठी रामदास आठवले कालपासून प्रयत्नात आहेत. शिवसेना-भाजपच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या शिवसेना-भाजपचे नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत.
मात्र, आठवलेंना या बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलंय. त्यामुळे पक्षाच्या आजच्या बैठकीत आम्ही यावर नक्की फेरविचार करू, असं महातेकर यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.