www.24taas.com, मुंबई
सुप्रीम कोर्टानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातल्या याचिकेवरचा निकाल राखून ठेवला आहे. २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणातला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला हायकोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या शिक्षेविरोधात पाकचा अतिरेकी अजमल कसाब याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत कसाबने जन्मठेपेची मागणी केली आहे .कसाबच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांच्यामार्फत ही मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्यावतीने अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातही कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब होणार की नाही हे पुढील सुनावणीत स्पष्ट होईल.
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="89417"]