काँग्रेसला राष्ट्रवादीने गृहीत धरू नये- माणिकराव

राष्ट्रवादीच्या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेस गृहीत धरू नये असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची राज्यात जरी आघाडी असली तरी स्थानिक नेतृत्वात अजिबात सुसंवाद नाहीये.

Updated: Apr 20, 2012, 01:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेस गृहीत धरू नये असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची राज्यात जरी आघाडी असली तरी स्थानिक नेतृत्वात अजिबात सुसंवाद नाहीये.. त्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेसने गृहीत धरू नये. म्हणूनच आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

 

ठाणे महापालिकेतल्या काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचा संताप झाला आहे. राज्यात आघाडी ठेवायची की नाही ते काँग्रेसनं जाहीर करावं, अशी धमकीच राष्ट्रवादीनं दिली आहे. त्यामुळे दोन्हा काँग्रेसच्या आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही राष्ट्रवादीनं केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसनं शिवसेना आणि भाजपशी घरोबा केल्यानंही राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित होतं मात्र शिवसेनेनं सोयरिक करून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं थेट राज्यातल्या आघाडीत बिघाडीची भाषा केली आहे.

 

ठाणे महापालिकेतला सत्तासंघर्ष विकोपाला गेलाय. विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसनं स्वतःकडं घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज झाली आहे. आजच्या महासभेत राष्ट्रवादी आणि मनसेचे नगरसेवक काळ्या फिती लावून सभागृहात आले. तर काँग्रेसचे एक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनीही पक्षाच्या भूमिकेचा निषेध करीत काळी फित लावून सभागृहात प्रवेश केला. शिवसेना आणि काँग्रेसनं केलेली ही राजकीय खेळी पक्षातल्याच लोकांना आवडलेली दिसत नाही.