राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षामुळे युवकाची आत्महत्या

मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका युवकाने आत्महत्या केली आहे. दोन गटातल्या भांडणावरून त्याने ही आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. युवकाजवळ एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे तसंच पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण पाटील यांचीही नावे आहेत.

Updated: Apr 20, 2012, 12:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका युवकाने आत्महत्या केली आहे. दोन गटातल्या भांडणावरून त्याने ही आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. युवकाजवळ एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे तसंच पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण पाटील यांचीही नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या कांदिवलीमध्ये निकेश भंडारी या युवकानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.

 

आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे, पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण पाटील आणि इतर १५ जणांना जबाबदार धरलं होतं. होळीच्या दिवशी चारकोपला काही गुंडांनी निकेषला मारहाण केली होती.

 

याबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी टाळाटाळ केली. यामागे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे असल्याचा आरोप भंडारी कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे आता पोलीस आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे या प्रकरणात अडकले आहेत.