..तर राजला शिंगावर घेईन - उद्धव ठाकरे

अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असे प्रतिउत्तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. रालोआच्या निर्णयापूर्वीच राष्‍ट्रपतीपदाचे काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा ही मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेसमुळे मिळालेल्या विजयाची परतफेड आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी बुधवारी केला होता.

Updated: Jun 21, 2012, 04:10 PM IST

www.24taas.comमुंबई

अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असे प्रतिउत्तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष  उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले  आहे. रालोआच्या निर्णयापूर्वीच राष्‍ट्रपतीपदाचे काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा ही मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेसमुळे मिळालेल्या विजयाची परतफेड आहे, असा आरोप  राज ठाकरे यांनी बुधवारी केला होता.

उद्धव यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत हे प्रती आव्हान दिले. अहमद पटेलांना कोण भेटलं. कोण कोणाला भेटले. या भेटीगाठीचा तपशील जाहीर करा, असे उद्धव यांनी राज यांना आव्हान दिले. त्यांनी मनसेच्या टोल नाका आंदोलनावर टीका केली. संघाच्या भूमिकेला शिवसेनचा विऱोध आहे, उद्धव म्हणाले.

मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण गप्प होते, परंतु मनपा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी शिवसेनाप्रमुखांवर आरोप केल्याने मराठी मतदार शिवसेनेकडे वळला आणि त्यामुळेच त्यांना सत्ता मिळाली. त्याची परतफेड म्हणूनच शिवसेनेने मुखर्जी यांना पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे यांचा गैरफायदा घेण्यात असून त्यांच्या को-या कागदावर सह्या घेतलेल्या असल्यानेच शिवसेनेला राज्याची सत्ता हस्तगत करण्यास उशीर झाला असे संदिग्ध विधानही त्यांनी केले. शिवसेना नेते आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांच्या मुंबईत कुठल्या हॉटेलमध्ये भेटी झाल्या याची माहितीही आपल्याकडे असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता.