बाळासाहेबांचा अनेकांनी फायदा घेतला- राज ठाकरे

सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे मला समजले, हे मला माहिती आहे. कोऱ्या कागदावर त्यांनी सह्या केल्या म्हणून इतकी वर्षे लागलीत सत्ता यायला. त्यांच्या सह्या घेतलेल्यांनी त्यांचा किती फायदा घेतला आहे. ते पण मला माहिती आहे. तो माणूस किती सरळ आहे, भोळा आहे, याची मला कल्पना असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले.

Updated: Jun 20, 2012, 09:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे मला समजले, हे मला माहिती आहे. कोऱ्या कागदावर त्यांनी सह्या केल्या म्हणून इतकी वर्षे लागलीत सत्ता यायला. त्यांच्या सह्या घेतलेल्यांनी त्यांचा किती फायदा घेतला आहे. ते पण मला माहिती आहे. तो माणूस किती सरळ आहे, भोळा आहे, याची मला कल्पना असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले.

 

निळकंठ खाडीलकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी निळकंठ खाडीलकरांनी राज ठाकरेंना विरोधी पक्षाशी युती करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

 

बाळासाहेबांच्या याच भोळ्या स्वभावाचे किती जणांनी फायदे घेतले याचीही यादी माझ्याकडे आहे. बाळासाहेबांच्या वेळचं राजकारण वेगळं होतं आताचं राजकारण वेगळं आहे. बाळासाहेबांचं राजकारण मी लहानपणापासून पाहात आलोत म्हणून आज मी माझा पक्ष काढू शकलो, चालवतो आहे आणि पुढे चालविणार आहे. त्यांचा अख्खा अनुभव माझ्या पाठीशी आहे, गाठीशी आहे म्हणून मी आता कार्य करू शकतो आहे, अशी प्रांजळ कबुली राज ठाकरे यांनी यावेळी दिली.

 

 

काय आपल्याकडचे विरोधी पक्ष! काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतात. याला विरोधीपक्ष म्हणतात? पाठिंबा देऊन वर सारवासारवीचे उत्तरं देतात. आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत नाही, प्रणवदांना पाठिंबा देत आहोत. का ते बंगाली आहे म्हणून का? असा जोरदार हल्ला त्यांनी शिवसेनेवर चढविला आहे.

 

मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर आणि सध्याच्या त्यांच्या राजकारणावर आसूड ओढले. प्रणवदांना पाठिंबा देण्याचं कारण काय, काय तुमचे जीवश्य-कंठश्य मैत्र आहेत का? सारखे सारखे अहमद पटेल मुंबई येऊन जातात कशाला..... आम्हांला कळत नाही का यांच्या बैठका कुठे होतात ते.... ज्या भारतीय जनता पक्षासोबत इतके दिवस काढले, त्या एनडीएचा विचार करायचा नाही. तर का म्हणे त्यांनी उमेदवार दिला नाही. नाही दिला थांबा ना जरा.... असा सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

 

 

मागच्या वेळी प्रतिभाताई पाटील..... वर्तमानपत्रात तारखेनुसार माझ्याकडे नोंदी आहेत. की मराठी पंतप्रधान होत असेल तर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र यावेत आणि माझा प्रतिभाताईंना पाठिंबा द्यावा, का तर पहिला मराठी राष्ट्रपती होणार आहे. तेव्हा समजू शकतो. पण आता काय कारण आहे, प्रणव मुखर्जांना पाठिंबा देण्याचं.... असा जळजळीत सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

शिवसेनेचा महापौर व्हावा म्हणून मी ठाण्यात पाठिंबा दिला की नाही.... पण काय केलं नाशिकमध्ये यांनी.... काँग्रेस आणि एनसीपीबरोबर गेले. यांच्यासोबत युती करायला सांगताहेत का तुम्ही मला..... सत्ताधाऱ्यांबरोबर लगट करणारे हे विरोधी पक्ष यांच्यावर कोण भरोसा ठेवेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

 

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी ज्यांना ओ का ठो महाराष्ट्र माहित नाही, नसलेले हे पृथ्वीराज चव्हाण... कोंबडे काढून फिरायचं...कधी कोणत्या काँट्रवर्सीत अडकायचं नाही. गप्प असणारा माणूस, काम न करणारा माणूस अचानक मतदानाच्या अगोदर बोलतो की, बाळासाहेब ठाकरे या निवडणुकीनंतर निष्प्रभ झालेले दिसतील. मला तेव्हा कळलंच नाही हे का बोलले. तर याचं कारण होतं शिवसैनिक चिडावे, मराठी माणसाला वाईट वाटावं आणि जास्त जोमाने काम करून शिवसेनेला मतदान करावे. हे आतलं झालेलं सेटलमेंट!!!!!! त्यातून आत्ता मिळालेला प्रणव मुखर्जींचा पाठिंबा यातून लक्षात येतं की महाराष्ट्रात विरोध पक्ष आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

 

[jwplayer mediaid="124536"]

 

[jwplayer mediaid="124540"]