www.24taas.com, मुंबई
परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे भाडे आता १२ रूपये झाले आहे. रिक्षाचालक संपावर गेले तर परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा संप होणार की नाही, याची चर्चा आहे.
दरम्यान, इलेक्ट्रीक मीटर बसवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांनी संपाची भूमिका कायम ठेवली आहे. तसेच करण्यात आलेली
भाडेवाढ अपेक्षेइतकी नाही त्यामुळे राज्यभरातील १५ लाख रिक्षाचालक १६ एप्रिलच्या संपात सहभागी होतील, असे मुंबई रिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी स्पष्ट केले आहे.
रिक्षाची भाडेवाढ करूनही संप केला तर संपकरी रिक्षाचालकांचे परमिट रद्द करू, असा गंभीर इशारा परिवहन सचिव शैलेश शर्मा यांनी रिक्षाचालकांना दिला आहे. पहिल्या टप्प्यासाठी १ रुपयाची वाढ देण्यात आली. दुसर्या टप्प्यासाठी अलीकडेच ५0 पैशांची वाढ दिली गेली असल्याने या टप्प्यासाठी भाडेवाढ टळली आहे. टॅक्सीदरवाढीसंदर्भात १९९६ साली नेमलेली पीएमए हकीम यांच्या अध्यक्षतेखालील समिती कालबाह्य झाल्याची तक्रार टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीदरवाढीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असल्याचे शर्मा यांनी यावेळी दिली.
संबंधित आणखी बातमी
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर अनिवार्य
व्हिडिओ पाहा