राज ठाकरे बाळासाहेबांना भेटायला 'मातोश्री'वर

आजाराच्या निमित्ताने का होईना, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.

Updated: Jul 16, 2012, 06:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

आजाराच्या निमित्ताने का होईना, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता ते मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.

 

उध्दव यांच्या प्रकृतीबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्याशी  राज चर्चा करणार आहेत. त्यांनंतर संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उध्दव यांची भेट घेणार आहेत. तसेच ते लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहे. आज सकाळी उध्दव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्याने  लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

 

काही वेळापूर्वी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. सध्या उध्दव यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, अलिबागमधला आपला नियोजित कार्यक्रम सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांची कुटुंबीयासह भेट घेतली.

 

शिवसेनेचे नेतेही उद्धव यांची भेट लिलावतीमध्‍ये घेतली. निलम गो-हे, दिवाकर रावते यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. उद्धव यांची प्रकृती चांगली असल्‍याची माहिती रावते यांनी पत्रकारांना दिली. याशिवाय  रामदास कदम, आमदार अनिल देसाई, रिपाईंचे रामदास आठवले इत्‍यादी नेत्‍यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.