रेल्वे प्रवाशांच्या मदतीला 'झी २४ तास'

रेल्वे कोलडमल्यानं आज रुग्णांचे अतोनात हाल झाले. हॉस्पिटलमध्ये निघालेल्या रुग्णांना आज रेल्वे स्टेशनवर तासनतास खोळंबून रहावं लागलं. उशिरानं येणाऱ्या ट्रेन खचाखच भरलेल्या असल्यानं त्यात चढणं रुग्णांसाठी अग्नीदिव्य होतं.

Updated: Apr 18, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

रेल्वे कोलडमल्यानं आज रुग्णांचे अतोनात हाल झाले. हॉस्पिटलमध्ये निघालेल्या रुग्णांना आज रेल्वे स्टेशनवर तासनतास खोळंबून रहावं लागलं. उशिरानं येणाऱ्या ट्रेन खचाखच भरलेल्या असल्यानं त्यात चढणं रुग्णांसाठी अग्नीदिव्य होतं.

असहाय्य रुग्ण त्यामुळे प्लॅटफॉर्मवर हतबल होऊन बसले होते. ठाण्यात तुळसीदास कदम नावाचे कॅन्सर पेशंट परळमधल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशनवर रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते. पण प्रचंड गर्दीत त्यांना ते शक्य होत नव्हतं. अखेर ‘झी २४ तास’नं रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून कदम यांना लोकलमधून व्यवस्थित पाठवण्याची व्यवस्था केली तेव्हा त्यांचा प्रवास काहीसा सुसह्य झाला, अर्थात रेल्वे धिम्या गतीनं जात असल्यानं हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत त्यांना उशीर झाला.

कदम यांना उशिरा का होईना ‘झी २४ तास’च्या मदतीमुळे रेल्वेमध्ये चढता तरी आलं, पण असे अनेक रुग्ण होते ज्यांना अशा स्थितीत हॉस्पिटलमध्ये पोहचता आलं नाही. आधीच व्याधीग्रस्त असलेल्या रुग्णांना रेल्वे खोळंबल्यानं मनस्तापाच्या आणखी वेदना असहाय्य झाल्या होत्या.

तसचं आपण्यास काही अडचणी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा

आमचा टोल फ्री नंबर - 1800-22-1010

फोटो पाठविण्यासाठी ई-मेल -zee24taasonline@gmail.com