'शिवाजी पार्क'वरून पुन्हा 'राज'कारण!

शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी मनसेनं केलेला अर्ज मुंबई महापालिकेने नाकरलीय. त्यामुळे आता मैदानासाठी मनसेने हायकोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्र खाद्य महोत्सवासाठी शिवाजी पार्क मिळावं यासाठी मनसेकडून हा अर्ज करण्यात आला होता. मात्र पालिकेने हा अर्ज नाकारला आहे.

Updated: Apr 16, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी मनसेनं केलेला अर्ज मुंबई महापालिकेने नाकरलीय. त्यामुळे आता मैदानासाठी मनसेने हायकोर्टात धाव घेतली आहे.

 

महाराष्ट्र खाद्य महोत्सवासाठी शिवाजी पार्क मिळावं यासाठी मनसेकडून हा अर्ज करण्यात आला होता. मात्र पालिकेने हा अर्ज नाकारला आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. ३ मे ते १० मे दरम्यान मनसेकडून महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. आता पालिकेने अर्ज नाकारल्याने मनसेनं कोर्टात धाव घेत शिवाजी पार्कसाठी पुन्हा लढा पुकारलाय.

 

महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी १३ फेब्रुवारी रोजी शिवाजीपार्क मैदान मिळावे, अशी याचिका मनसेने दाखल केली होती. येथे प्रचारसभेसाठी परवानगी देण्यास विलंब करत असल्यामुळे मनसेने मुंबई महापालिकेविरोधात कोर्टात दाद मागितली होती. सभेच्या परवानगीसाठी मनपाकडे तब्बल ३५ अर्ज केले तरी परवानगी मिळालेली नव्हती.

Tags: