स्कूलबस नियम, संघटनेची ३१ मेची डेडलाईन

www.24taas.com, मुंबई राज्य सरकारनं स्कूल बसेसच्या सुरक्षेबाबत पुन्हा नवे नियम तयार केलेत. या नियमांवर स्कूल बस असोसिएशननं नाराजी व्यक्त केली आहे. त्यासाठी कोर्टात जाण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी ३१ मेची डेडलाईन दिली आहे.

Updated: May 11, 2012, 12:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राज्य सरकारनं स्कूल बसेसच्या सुरक्षेबाबत पुन्हा नवे नियम तयार केलेत. या नियमांवर स्कूल बस असोसिएशननं नाराजी व्यक्त केली आहे. त्यासाठी कोर्टात जाण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी ३१ मेची डेडलाईन दिली आहे.

 

राज्यातल्या सगळ्या स्कूल बसेसना आता आपत्कालीन खिडकीच्या ठिकाणी आपत्कालीन दरवाजा बसवणं बंधनकारक आहे. त्यामुळे स्कूलबसमधल्या आठ सीटस कमी कराव्या लागणार आहे. तसंच एक शिडी लावणंही बंधनकारक आहे. तसंच छोट्या स्कूल बसेसमध्ये महिला अटेंडंट असावी, असा नियम करण्यात आलंय. त्यासाठी ३१ मेचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

 

याआधी स्कूलबसच्या वेगावर नियंत्रणाचेही आदेश काढण्यात आलेत. स्कूल बस मालकांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. गेल्या दोन वर्षांपासून स्कूल बस मालक स्कूल बस सुरक्षा योजनेची मागणी करतायत. पण राज्य सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही. आता या मुद्द्यावरुन स्कूल बस मालकांनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केलीय.