www.24taas.com, बुलडाणा
बुलडाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात पार्थुडा-शेगाव ही एसटी बस खिरोडा इथल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जण ठार झालेत तर १७ प्रवासी जखमी झालेत. जखमींवर अकोला रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बसची टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. ७५ फूटांवरुन ही बस खाली नदीत कोसळली. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. मृतांमध्ये बहुतांश शाळकरी मुलांचा समावेश असून बसचा चालकदेखील या अपघातात मृत्यूमुखी पडलाय. १९ जणांचे मृतदेह हाती लागले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. यावेळी आजुबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. गॅस कटरने बसचा पत्रा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलीय.