अंधश्रद्धेचा बळी : आजोबा-मामानंच केली `सपना`ची हत्या

यवतमाळमध्ये सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सपना पळसकर हिचा सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आणि नरबळीचा प्रकार उघड झाला. आता या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झालीय. ती म्हणजे सपनाच्या आजोबा आणि मामानंच तिची हत्या केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 25, 2013, 08:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
यवतमाळमध्ये सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सपना पळसकर हिचा सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आणि नरबळीचा प्रकार उघड झाला. आता या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झालीय. ती म्हणजे सपनाच्या आजोबा आणि मामानंच तिची हत्या केलीय.
गावावर देवीचा प्रकोप येईल म्हणून आजोबा आणि मामानेच चिमुरडीचा जीव घेतला. या घटनेनं संपूर्ण महाराष्टालाच हादरवून टाकलंय. सात महिन्यापासून बेपत्ता असलेल्या यवतमाळच्या चोरंबा येथील सात वर्षीय सपना पळसकर या चिमुरडीची हाडं आणि कपड्यांचे तुकडे सापडले गावाशेजारी असलेल्या एका पडिक जमिनीतील झुडुपांत दोन दिवसांपूर्वी आढळले होते.

गोपाळ पळसकर आणि शारदा पळसकर या आदिवासी शेत मजुरांची सपना ही सात वर्षीय मुलगी सपना २४ ऑक्टोबर रोजी घरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर गावातीलच देवा आत्राम याला दाट झुडपात बालिकेच्या डोक्याची कवटी सापडली. झुडपातच हाडं व कपडे पडून होते. आत्राम यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतक मुलीची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. आज या मुलीच्या खुन्यांना म्हणजेच तिच्या आजोबांना आणि मामाला पोलिसांनी अटक केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.