www.24taas.com, नागपूर
रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरी निराशाच आली आहे. त्यातल्या त्यात नागपूरवर रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांची कृपादृष्टी पडली आहे. त्यामुळे नागपुरला काही प्रमाणात फायदा मिळाला आहे.
रेल्वे पुरवत असलेल्या ‘नीर’ पाण्याचे काही आणखी प्लँट्स देशात उभारण्यात येणार आहेत. नागपूर येथेही त्यातील एक प्लँट असेल. याशिवाय, रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्युटही नागपुरमध्ये सुरू करण्यात येईल, असं अश्वासन रेल्वे बजेटमध्ये मिळालं आहे. अद्ययावत लाऊंजही उभारण्यात येणार आहेत.
या प्रमाणात मुंबईवर मात्र अन्याय झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईकडून रेल्वेला सर्वाधिक महसूल प्राप्त होतो. तरीही मुंबईला ७२ नव्या गाड्या आणि एसी डब्यांची घोषणा केली आहे. या घोषणा प्रत्य़क्षात उतरण्यात बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.