सोनिया गांधींच्या सभेवेळी विदर्भवादी नेत्यांची घोषणाबाजी

काँग्रेसच्या अ्ध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेच्या दरम्यान नागपुरात आज विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या नेत्यांनी सोनियांची सभा सुरु असताना मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांमुळे तो अयस्वी ठरला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2013, 10:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
काँग्रेसच्या अ्ध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेच्या दरम्यान नागपुरात आज विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या नेत्यांनी सोनियांची सभा सुरु असताना मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांमुळे तो अयस्वी ठरला.
विदर्भवादी नेत्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मात्र त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर या नेत्यांनी रिझर्व बॅँक चौकात जाऊन आंदोलन केलं. सभा संपल्यानंतर सोनिया गांधींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या जनतेला गाडीतून बाहेर येऊन अभिवादन केले. त्यावेळीही विदर्भवादी नेत्यांनी त्यांना वेगळ्या विदर्भाचे फलक दाखवले.
दरम्यान, नागपूरमध्ये आज झालेल्या सोनिया गांधींच्या सभेचा मोठा फटता एसटी महामंडळाच्या वाहतुकीला बसला. या सभेत कार्यकत्यांना आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने चक्क १५०० पेक्षा जास्त बसेस बुक केल्या होत्या. एकट्या चंद्रपूर विभागातूनमधून काँग्रेसने ५४६ आरक्षित केल्या होत्या. या गाड्या कमी पडल्यानेर आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतूनही गाड्या मागविल्या. त्यामुळे राजकीय शक्ती दाखवण्याच्या या अट्टहासाचा फटका चंद्रपूरसह विदर्भातील प्रवाशांना बसला.
चंद्रपूरातल्या एसटीच्या ७० टक्के फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात ठिकठीकाणी प्रवासी खोळंबले होते. तर नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय झाली. याबाबत प्रवाशांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. बस स्थानकांवर प्रवासाची तासान-तास बसची वाट पाहत ताटकळत उभे होते. चंद्रपूर विभागात केवळ ५०५ बसेस उपलब्ध असल्यामुळे चंद्रपूरच्या एस.टी. च्या अधिका-यांनी इथल्या २०० आणि नजीकच्या भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतून ३४६ बसेस मागवून काँग्रेस पक्षाची मागणी पूर्ण केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.