नागपूर : जळगावचा विजय चौधरी यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलाय. मुंबईच्या विक्रांत जाधवला 6-3नं चीतपट करत विजयनं सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलीय. नागपूरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीची यंदाची फायनल ही मॅटवर रंगली.
फायनलमध्ये मॅट विभागातील विजेता विक्रांत जाधव आणि माती विभागातील विजेता विजय चौधरीनं धडक मारली होती. अखेर अनुभवाच्या जोरावर विजयनं बाजी मारत दुस-यांदा विजेतेपद पटकावलं. मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्र केसरीच्या लढतीसाठी हजेरी लावली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच विजय चौधरीला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.