www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या येत्या 17 मे पासून होणार आहेत. शिक्षकांच्या बदलीचे वारे मे महिन्यापासून वाहू लागतात, बदली रद्द व्हावी, जवळ व्हायला हवी म्हणून काहींकडून मतलई वारेही नंतर वाहतात.
या बदलीत दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती, अशा 20 टक्के सर्वसाधारण बदल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केले आहे.
जिल्हास्तरीय बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी सर्व बदल्या समुपदेशनाने करण्याच्या सूचना आहेत.
जिल्हास्तरीय प्रत्यक्ष बदली प्रक्रिया 17 मे ते 23 मे आणि तालुकस्तरीय बदल्या 26 ते 31 मेपर्यंत पार पडणार आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार लवकरच सर्व संवर्गाच्या प्रशासकीय बदल्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोडेबाजार सुरू होतो. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शासनाने समुपदेशनाने बदल्या करण्याचे निर्देश दिले असल्याने, आता त्याला आळा बसला आहे.
शिक्षकांसमोर बदली स्थळांचे पर्याय देऊन त्यापैकी एक निवडण्याची मुभा त्यांना समुपदेशनात दिली जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.