अॅसिड टाकून वृद्ध दाम्पत्याची हत्या

श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा शिवारातील कुकडी कालव्याजवळ राहणारे रंगनाथ गणपत भोसले (७०), सरस्वती रंगनाथ भोसले (६५) या वृद्ध शेतकरी जोडप्याची अॅसिड टाकून क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 6, 2014, 03:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, श्रीगोंदे, अहमदनगर
श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा शिवारातील कुकडी कालव्याजवळ राहणारे रंगनाथ गणपत भोसले (७०), सरस्वती रंगनाथ भोसले (६५) या वृद्ध शेतकरी जोडप्याची अॅसिड टाकून क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.
ही दुर्दैवी घटना रविवारी संध्याकाळी उघडकीस आली. कुकडी साखर कारखान्याजवळ कुकडी कालव्याच्या शेजारी भोसले कुटुंब आपल्या घरात असतांना हा प्रकार घडल्याचं कळतंय. पोलीस याबाबत तपास करत असून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
रंगनाथ भोसले हे कुकडी कारखान्यावर उसाची टिपरी वेचून उदरनिर्वाह करीत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.