www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. सोने खरेदीसाठी जळगाव प्रसिद्ध असल्याने सराफ भाजारात मोठी गर्दी आहे. जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर सध्या प्रतितोळा ३१ हजारावर आहे.
लग्न सराई असल्यामुळे सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होतेय. महिला वर्ग आपल्या मनपसंत दागिने खरेदी करतात दिसतायेत. गेल्या महिन्यात सोन्याचे भाव ३० हजार रुपये प्रति तोळा होता. मात्र आज प्रती तोळा ३० हजार ६०० हजारांवर आहे. यामुळे भाव कमी असल्याने मुहर्त साधून सोन्याची खरेदीला सराफ बाजारात मोठी गर्दी आहे.
सोने खरेदीला सकाळ पासूनच सराफ बाजारात गर्दी आहे. गतवर्षीची तुलना करता यावर्षी सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. २०१३मध्ये सोने १० ग्रॅमला २७, २८० रुपये असा दर होता. तर २०१४मध्ये १० ग्रॅमला ३०, ६०० रुपये इतका दर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.