पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पीएम मोदींशी कॉलवर बोलण्यास का दिला होता नकार, केला मोठा खुलासा

Vinesh Phogat : भारताची माजी महिाल कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा खुलासा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिला होता. यामागचं कारण आता तीने सांगितलं आहे. 

Updated: Oct 2, 2024, 04:33 PM IST
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पीएम मोदींशी कॉलवर बोलण्यास का दिला होता नकार, केला मोठा खुलासा title=

Vinesh Phogat Denied Call With PM Modi : पॅरिस ऑलिम्पमक 2024 मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पदक जिंकण्यापासून थोडक्यात हुकली होती. 50 किलो वजनी गटात खेळताना विनेशने अंतिम फेरीत धडक मारली. पण अंतिम फेरीच्या आधी झालेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅम जास्त आढळल्याने ऑलिम्पिक संघटनेने तिला अपात्र ठरलं. यामुळे विनेश फोगाटचं सुवर्ण पदक जिंकण्याच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला. विनेशने क्रीडा लवादाकडेही दाद मागितली होती, पण क्रीडा लवादानेही तिची याचिका फेटाळून लावली. या प्रकरणामुळे विनेश फोगाट बरीच चर्चेत होती.

पीएम मोदींचा विनेशला व्हिडिओ कॉल

या घटनेनंतर विनेश पॅरिसलला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा विनेश फोगाटसाठी व्हिडिओ कॉल (Video Call) आला होता. पण विनेश फोगाटने पीए मोदी यांच्याशी बोलण्यास नकार दिला होता. यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा आता विनेश फोगाटने केला आहे.

विनेशने केला खुलासा

विनेश फोगाटने 'लल्लनटॉप'ला दिलेल्या एका मुलाखतीत पीएम मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर का बोलली नाही याचं कारण सांगितलं आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंशी पीएम मोदी यांनी व्हिडिओ कॉल करुन चर्चा केली. या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात होता. पण विनेश सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्याच्या विरोधात होती.

पदक हुकल्यानंतर पीएम मोदींचा फोन आला होता का असा प्रश्न विनेश फोगाटला विचारण्यात आला. याला उत्तर देताना विनेशने पीएम मोदींचा आपल्याला फो आला होता, पण मी बोलण्यास नकार दिल्यांच सांगितलं. विनेशने दिलेल्या माहितीनुसार फोन तिच्या नंबरवर आला नव्हता, तर भारतीय संघाबरोबर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नंबरवर आला होता. त्यांनी आपल्याला पीएम मोदींना बोलायचं असल्याचं सांगितलं.

पण त्यांनी पीएम मोंदीशी बोलण्याआधी त्यांनी एक अट ठेवली. पंतप्रधानांशी बोलताना संघातील एकही व्यक्ती तुमच्याबरोबर नसेल तसंच तुमचा फोनही तुमच्याबरोबर ठेऊ शकत नाही. आमच्या टीममधील दोन लोकं तुमच्याबरोबर असतील. यातील एक व्यक्ती पीएम मोदींशी बोलणं करुन देईल, तर दुसरा व्यक्ती व्हिडिओ शुटिंग करेल. यावर विनेशने शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणार आहात का विचारलं, त्यांनी हो सांगितल्यावर मी त्यांना सॉरी म्हटलं. माझ्या त्यावेळच्या भावना आणि केलेली मेहनत अशा प्रकारे सोशल मीडियावर सार्वजनिक खिल्ली उडवून घ्यायची नव्हती असं विनेशे सांगितलं.