www.24taas.com, नाशिक
जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका येईल तेव्हा येईल पण आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती धक्कादायक माहिती आलीय. जलसंपदा खात्याचे नाशिक येथील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी 15 पानांचे एक पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले असून त्यात जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आलाय.
पांढरे जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्यही आहेत. राज्यात सिंचनावर किमान 20 हजार कोटी रूपयांचा अनाठायी खर्च झालाय. त्यातील 12 हजार कोटी रूपये उपसा सिंचन योजनांवर खर्च झाले आहेत. सध्या उपसा सिंचन योजनांवर 25 के 30 कोटींचा खर्च केला जात असून त्यातील 90 टक्के वाया जाणार आहेत. पांढरे यांच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल आपल्याकडे पाठवावा असे निर्देश राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहेत.
दुसरीकडे पांढरे विरूद्ध बहुसंख्य अभियंदे असा वाद रंगू लागलाय. नाशिक येथील अभियंता महासंघाच्या बैठकीतही पांढरेंचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात आला.