विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू...

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक यांच्या अधिपत्याखाली नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यामधील विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे.

Updated: Apr 16, 2013, 02:25 PM IST

www.24taas.com, नाशिक
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक यांच्या अधिपत्याखाली नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यामधील खाली नमूद गट क आणि ड मधील तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक, लघुलेखक (निम्नश्रेणी), विजतंत्री, लोहार, नळकारागीर, हमाल पदावर नियुक्ती आणि प्रतिक्षा यादीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून २०-०४-२०१३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
1. तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (पे बँड रू. ५२००-२०२००, ग्रेड पे-२४००/-) – एकूण पदे १३
2. लघुलेखक (निम्नश्रेणी) (पे बँड रू. ९३००-३४८००, ग्रेड पे-४३००/-) – एकूण पदे १
3. विजतंत्री (पे बँड रू. ५२००-२०२००, ग्रेड पे-२४००/-) – एकूण पदे १
4. लोहार (पे बँड रू. ५२००-२०२००, ग्रेड पे-२४००/-) – एकूण पदे १
5. नळ कारागीर (पे बँड रू. ५२००-२०२००, ग्रेड पे-२४००/-) – एकूण पदे १
6. हमाल (पे बँड रू. ५२००-२०२००, ग्रेड पे-२४००/-) – एकूण पदे ३

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया दिनांक २-४-२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होणार आहे व दिनांक २०-०४-२०१३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधा.