'उमवि'च्या कुलगुरूंनी दिला शेतकऱ्यांना महिन्याचा पगार

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीला हात भार लावला आहे.

Updated: Mar 14, 2014, 07:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीला हात भार लावला आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक अधिकारी आणि कर्मचारी हे देखील गारपीटग्रस्तांना मदत करणार आहेत.
उमविच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी आपला एक दिवसाचा पगार देऊ केला आहे.
कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी आपला संपूर्ण एक महिन्याचा पगार म्हणजे पावणे दोन लाख रुपये शेतकऱ्यांसाठी देण्याची घोषणा केली.
गारपीटीमुळं संपूर्ण महाराष्ट्राला फटका बसला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारपीटने सर्वात जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या हातात आलेली पिकं गारपीटीनं हिरावून नेली आहेत.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासोबत राज्यातील कृषी सहायक संघटनेच्या सदस्यांनी देखील गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी आपलं एक दिवसाचं वेतन देण्यीची घोषणा केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.