नाशिकला लवकरच एक वेळ पाणीपुरवठा

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. 7 जुलैपासून नाशिकला एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

Updated: Jun 30, 2014, 11:57 PM IST
नाशिकला लवकरच एक वेळ पाणीपुरवठा title=

नाशिक : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. 7 जुलैपासून नाशिकला एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणा-या गंगापूर आणि दारणा धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्यानं तसंच दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने, नाशिक शहरात ७ जुलै पासून एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

चार दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील धरणाचा आढावा घेऊन नाशिक महापालिकेला पाणी कपात करण्याच्या सूचना केल्या होत्या. 

त्यानुसार आज नाशिकच्या महापौरांनी पाणी पुरवठा अधिकारी आणि गटनेत्यांची बैठक बोलावून एक वेळ म्हणजेच चार विभागात पाणी पुरवठा निम्यावर आणलाय तर ज्या सिडको सातपूर परिसरात आज एक वेळ पाणी पुरवठा सुरु आहे तिथे आहे तो तसाच सुरु राहणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.