www.24taas.com, वृत्तसंस्था, दुबई
भारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टेस्ट रँकिंगमधील आपापले रँकिंग कायम राखले. पुजारा सर्वोत्तम सहाव्या, तर कोहली विसाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताच्या अश्विुनने आपले अव्वल मानांकन कायम राखले आहे.
कसोटी क्रमवारीत पहिल्या विसांत केवळ या दोनच भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलर्स आघाडीवर आहे. इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कुकने पुन्हा एकदा पहिल्या दहांत स्थान मिळविले असून, नव्या क्रमवारीत तो दहाव्या स्थानावर आला आहे.
ऍशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीत शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने १८व्या क्रमांकावरून झेप घेत थेट सातवे स्थान मिळविले आहे. गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विमन, प्रग्यान ओझा या फिरकी गोलंदाजांबरोबर वेगवान गोलंदाज झहीर खानचा समावेश आहे. अश्वि न पाचव्या, तर ओझा नवव्या स्थानावर आहे. झहीर खानचे मानांकन दोनने घसरले असून, तो विसाव्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजीतही दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेच्या व्हर्नान फिलॅंडरची वर्णी लागली आहे.
ऍशेस मालिकेतील पहिली कसोटी गाजविल्यानंतर मिशेल जॉन्सनचे रँकिंग ४ अंकानी सुधारले असून, तो नव्या क्रमवारीत १९व्या स्थानावर आला आहे. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचे मानांकनदेखील सुधारले असून, तो सातव्या स्थानावर आला आहे.
आयसीसी टेस्ट रँकिंग – संघ
दक्षिण आफ्रिका (१३१), भारत (११९), इंग्लंड (११६), पाकिस्तान (११६), ऑस्ट्रेलिया (१०१), वेस्ट इंडीज (९५), श्रीलंका (८८), न्यूझीलंड (७५), झिंबाब्वे (३४), बांगलादेश (१८).
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.