फिफा वर्ल्डकप 2014 : थोडक्यात अपडेट

फ्रान्सनं होंडुरासवर 3-0 नं मात करत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात केली.

Updated: Jun 16, 2014, 10:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फ्रान्सनं होंडुरासवर 3-0 नं मात करत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात केली.
फ्रान्सची होंडुरासवर 3-0 नं मात
या मॅचममध्ये फ्रान्सचा विजय अटळ होता, आणि त्यांच्या या विजयाचा हिरो ठरला तो करिम बेंझेंमा, त्यानं दोन गोल झळकावत फ्रान्सच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
बेंझेमानं 45 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत आपल्या टीमला आघाडी मिळवून दिली.
स्विज्झर्लंडची इक्वेडोरवर 2-1 नं मात
स्विज्झर्लंड इक्वेडोरवर 2-1 नं मात करत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली. 
आदमिर मेहमेदी आणि हॅरिस सेफेरेविक स्वित्झर्लंडच्या विजयाचे ख-याअर्थानं हिरो ठरले.
स्विस टीमनं वर्ल्ड कपमध्ये धडाक्यात सुरुवात केली. सुरुवातीला इक्वेडोरनं गोल झळकावत आघाडी घेतली होती.
मात्र, स्वित्झर्लंडनं आपल्या खेळात कमालीची सुधारणा करत आपला विजय निश्चित केला.
मेसीचा गोल
लिओनेल मेसी या अर्जेन्टीनाच्या स्टार स्ट्रायकरनं गोल झळकवत जगभरातील फुटबॉल फॅन्सना सेलिब्रेशनची संधी दिली.
हर्जेगोविनियावर अर्जेन्टीनाचा 2-1 नं विजय मिळवला.
मेसीनं मैदानी गोल केला आणि स्टेडियममधील फुटबॉलप्रेमींनी मेसी... मेसी.... नावाचा एकच जयघोष केला.
मेसीनं घर भाड्यानं घेण्याचा विचार बदलला
वर्ल्ड कपमुळे ब्राझीलमधील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. जगातील सर्वाधिक कमाई असलेला फुटबॉलपटू लिओनेल मेसीलाही त्याचा फटका बसलाय.
आपल्या कुटुंबियांसाठी वर्ल्ड कप दरम्यान बेलो होरिझोन्टे इथं एक महाल भाडय़ाने घेण्याचा विचार मेसीने त्याने वाढलेल्या भावांमुळे रद्द केला.
नेदरलॅंड्‌स टीमवर मीडियाकडून कौतुकांच वर्षाव
सलामीलाच गतविजेत्या स्पेनचा दारुण पराभव करणा-या नेदरलॅंड्‌स टीमवर मीडियाने कौतुकांच वर्षाव केलाय.
शौर्यपूर्ण आणि ऐतिहासिक अशा शब्दांत त्यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. हे आमचे हिरो आहेत.
ऑरेंजची स्वप्नपूर्ती सुरू झाली आहे. "अविश्‍वसनीय‘, "नेदरलॅंड्‌सकडून स्पेनचा धुव्वा‘ आणि "ऐतिहासिक‘, असे मथळे नेदरलॅंड्‌समधील वर्तमानपत्रांनी दिले आहेत.
स्पेनच्या जखमेवर मिठच चोळलं
नेदरलँड्सकडून झालेल्या लाजीरवाना पराभवातून अजून स्पेन सावरलेलही नाही तोच स्पेनला आम्ही 8 गोल्सने पराभूत करु शकलो असतो, असं मत नेदरलँड्सचा कॅप्टन रोबिन वॅन पर्सीने व्यक्त करत स्पेनच्या जखमेवर एकप्रकारे मिठच चोळलंय.
सलामीच्या लढतीतच नेदरलँड्सने गतविजेत्या स्पेनला 5-1ने पराभूत केलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.