ग्लॅमरस 'ज्वाला'चा जलवा!

बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 1, 2013, 01:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे. तेलगू चित्रपटात ती एका स्पेशल गाण्यामध्ये आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवणार आहे. बॅडमिंटन जगतामध्येही ज्वाला ग्लॅमरस गर्ल म्हणून लोकप्रिय आहे.
ज्वाला गुट्टा...... भारताची यशस्वी बॅडमिंटन प्लेअर... अश्वि न पोनप्पाबरोर तिनं वुमेन्स डबल्समध्ये भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. बॅडमिंटनमध्ये तर तिनं आपली जादू दाखवली आहेच शिवाय भारतीय बॅडमिंटनची ‘ग्लॅमरस गर्ल’ म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं. आता बॅडमिंटनची ही ग्लॅमडॉल तेलगू चित्रपटात आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे. ज्वालानं एका पुरस्कार सोहळ्यात आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवलं होतं. त्यामुळेच तिला आता टॉलीवूडमध्ये आपले पाय थिरकवण्याची संधी मिळाली आहे. ज्वाला तेलगू चित्रपटामध्ये एका खास गाण्य़ामध्ये तिच्या चाहत्य़ांना पाहायला मिळणार आहे.
भारताचा टेनिस्टार लिएंडर पेसही राजधानी एक्स्प्रेस या चित्रपटात बिग स्क्रिनवर झळकला होता. बॉलीवूडमध्ये पेसला पाहायला मिळाल्यानंतर आता ज्वालाही तिच्या चाहत्यांना बिग स्क्रिनवर दिसणार आहे. आपल्या खेळामुळं जेवढी प्रसिद्धी ज्वाला मिळाली त्याहून अधिक लोकप्रिय झाली ती तिच्या लूकमुळे. आपल्या ग्लॅमरस लूक आणि ट्रेंडी हेअर स्टाईलमुळे ती युथ आयकॉन बनली. तिच्या ग्लॅमरस लूकची चर्चा तिच्या खेळापेक्षा जास्त बॅडमिंटन विश्वामध्ये झाली.

आता बॅडमिंटन कोर्टवर ज्वाला जशी हिट झाली तशीच टॉलीवूमध्येही ज्वाला सुपरहिट ठरेल अशी आशा तिच्या चाहत्यांना असणार आहे.