शारापोवाचा सेक्सी फोटोशूट, दाखवला फिटनेस

रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोवा सध्या फ्रेंच ओपनच्या तयारीमध्येस व्यस्त आहे. मात्र, असे असले तरी ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. टेनिस कोर्टबरोबरच मारिया फॅशन मॅगझीनमध्येस हॉट फोटोशूट देण्यावरून चर्चेत अधिक आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2013, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस
रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोवा सध्या फ्रेंच ओपनच्या तयारीमध्येस व्यस्त आहे. मात्र, असे असले तरी ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. टेनिस कोर्टबरोबरच मारिया फॅशन मॅगझीनमध्येस हॉट फोटोशूट देण्यावरून चर्चेत अधिक आली आहे.
माद्रिद ओपनमध्येद सलग सामने जिंकून मारियाने आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. आपल्या या कामगिरीने तिने सेरेना विल्यिम्स सारख्या दिग्गज खेळाडूंना धोक्याचा इशारा दिला आहे. मारियाने सेक्सी फोटोशूट करून स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

माद्रिदमध्ये शारापोवा आणि ग्रिगोव्ह एकमेकांचा हात हातात घालून रोमँटिक वॉक करताना नजरेस पडले. आपल्या बॉयफ्रेंडबरोबर वॉकला जाण्याकवरून ती प्रत्येक ठिकाणी चर्चेत आहे. नुकताच मारियाने `एस्वार मेक्सिको` मॅगझीनच्या अंकासाठी फोटोशूट केलंय. या सेक्सी फोटोशूटमध्ये मारियाने स्किन कलरचा बॉडीसूट घालून फिटनेस दाखविण्याचा प्रयत्न केलाय.
मारियाच्या या सुपरमूड पाठीमागे तिचा बॉयफ्रेंड ग्रिगर दिमित्रिवचा मोठा हात आहे. शारापोव्हा ग्रिगरसाठीही लकी चार्म सिद्ध झाली आहे. माद्रिद ओपन दरम्यान ग्रिगोव्हगने नंबर एकचा खेळाडू नोव्हाक जोकोविचला पराभूत केले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.