www.24taas.com, मुंबई
दहव्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला. युगांडाच्या जॅक्सन केप्रोपेने पहिला तर केनियाच्या एकेझा केंबाईने दुसरे तर इथिओपियाच्या जेकब चेशरीने तिसरे स्थान पटकावले. महिलांच्या फुल मॅरेथॉनमध्ये केनियाच्या व्हेलिंटिने किपस्टरने पहिला क्रमांक मिळवला.
पुरुषांची हाफ मॅरेथॉन नरेंद्र सिंगने तर महिलांची हाफ मॅरेथॉन सुधा सिंगनं पूर्ण केलीय तब्बल ४० हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचाही उत्साह शिगेला पोहचलाय. सलमान खान, अनिल अंबानी, दिया मिर्झा, शरमन जोशी, राहुल बोस, विवेक ओबेरॉय, डिनो मोरिया यासारख्या सेलिब्रिटी भल्या पहाटे मुंबईकरांचा उत्साह वाढवण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मुंबईचे महापौर सुनील प्रभूही सहभागी झाले होते.
हाफ मॅरॅथॉनमध्ये नरेंद्र सिंगने पहिल्या क्रमांक पटकावला. तर सचिन पाटीलने दुसरा क्रमांक पटकावला. तर महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये सुधा सिंग पहिल, रितू पाल दुसरा तर मोनिका आथरे हिने तिसरा क्रमांक पटकावला.
मुंबई मॅरेथॉनच्या हाफ मॅरेथॉन गटात मराठी झेंडा फडकवला आहे. सचिन पाटील, मोनिका अथारे या धावपटूने बाजी मारली. नरेंद्र सिंग याने पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.
पूर्ण आणि अर्ध मॅरेथॉनसाठी यंदा भारताचे ५० पुरुष व २४ महिला स्पर्धक सहभागी झाले आहेत. सेनादलाचा बी. सी. तिलक हा पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहे. करण सिंगचीही ही पहिलीच मुंबई मॅरेथॉन आहे.
मुंबईतील लोकांचा उत्साह खूप काही सांगून जातो. येथे आल्याने मला चांगले वाटले. या विजयामुळे अतिशय आनंद झाला असून वर्षांची सुरुवात चांगल्या कामगिरीने झाल्याने खूप समाधान वाटते आहे, असे मोनिका अथारे हीने सांगितले.
सुधा सिंग सारख्या कसलेल्या धावपटूसोबत धावायला मिळाले याचाच मला जास्त आनंद आहे, असेही मोनिका म्हणाली. तसेच यंदा मुंबई मॅरेथॉनचा मार्ग चांगला असून ठिकठिकाणी मुंबईकरांनी मोठ्या उत्साहाने आमचे स्वागत केले त्यामुळे आणखीनच जोश वाढला आहे, असेही मोनिका यावेळी म्हणाली.