www.24Taas. झी मीडिया, न्यूर्याक
भारताचा लिएंडर पेस आणि झेक प्रजासत्ताकचा त्याचा जोडीदार रॅडेक स्टेपनेक यांनी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली तर दुसरीकडे भारताकडून खेळणाऱ्या सानिया मिर्झाने उपात्यंफेरीत धडक मारली आहे.
पुरुष दुहेरीतील अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन बंधूंची मक्तेदारी लिएंडर- रॅडेक मोडीत काढताना ०-१ अशा पिछाडीवरून पेस-स्टेपनेक जोडीने ही लढत ३-६, ६-३, ६-४ अशी जिंकून ऐतिहासिक शिखर गाठले. १९५१ नंतर मिश्र दुहेरीत चालू वर्षातील चारही ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न ब्रायन बंधूंच्या पराभवाने अपूर्णच राहिले.
अवघ्या २९ मिनिटांत पहिला सेट जिंकणार्यार ब्रायन बंधूंना दुसर्याे सेटमध्ये पेस-स्टेपनेकने कडवी टक्कर दिली. या दोघांनी आक्रमणात भर टाकत दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे ३७ आणि ४५ मिनिटांत खिशात घालून अंतिम फेरीत प्रवेश निश्चि.त केला. या बंधूंच्या तुलनेत आज पेस आणि स्टेपनेक यांचा खेळ अधिक बरहलेला दिसला.
दरम्यान, भारताची सानिया मिर्झा हिने चिनी जोडीदार जी झेंगसह यूएस ओपनच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
सानिया जोडीने प्रतिष्ठित स्पर्धेत १०वे मानांकन प्राप्त इन्डो आणि चायना जोडीने चौथे मानांकन प्राप्त चिनी तैईपेईची सू वी सी आणि चीनची शुआई पेंगवर १ तास आणि ५० मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात सरळ सेटमध्ये ६-४, ७-६ असा विजय मिळवला. २०१३मधील सानिया मिर्झाची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
सानिया आणि झेंग या जोडीला उपांत्य फेरीत आठवे मानांकन प्राप्त ऑस्ट्रेलियाची अँश्ले बार्टी आणि केसी डेलाक्युआच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.