नाशिकमध्ये मनसेचा 'वाघ' महापौर

नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिल्याने यतीन वाघ हे महापौर पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपचे सतीश कुलकर्णी यांना उपमहापौर पदाची लॉटरी नव्या राजकीय समिकरणामुळे लागली आहे.

Updated: Mar 15, 2012, 03:40 PM IST

www.24taas.com, नाशिक

नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिल्याने यतीन वाघ हे महापौर पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपचे सतीश कुलकर्णी यांना उपमहापौर पदाची लॉटरी नव्या राजकीय समिकरणामुळे लागली आहे.

मनसेचे ४०, भाजपचे १४ तर जनराज्य पक्षाचे २ असे ५६ च्या पक्षीय बलाबलाच्या जोरावर यतीन वाघ नाशिकमध्ये पहिले मनसेचे महापौर झाले आहेत. यतीन वाघ हे व्यवसायाने वकील आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेने करून दाखवलं, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. माकपच्या जायभाये या उमेदवाराला ३ मते मिळाली.

भाजपने पाठिंबा देताना  उपमहापौर  पदाची मागणी केल्याचे दिसून येत आहे.  भाजपने पाठिंबा जाहीर केल्याने मनसेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी आपला मनसेला पाठिंबा असल्याचे सांगितले. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीवेळी तटस्थ राहणार असल्याचे सांगितले आहे. नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक मनसेने गांभीर्याने घेतल्याने खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान,  नाशिकमध्ये पराभव मान्य असून घोडेबाजार रोखण्यासाठी आम्ही तटस्थ राहत असल्याचे नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

मनसेला थेट पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेने तटस्थ राहण्याचे ठरविले आहे. त्याबरोबरच छगन भुजबळ यांचा गढ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त २० जागा मिळाल्या असल्याने त्यांनीही तटस्थ राहण्याचे ठरविले आहे. मनसे ४० जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="65877"]

[jwplayer mediaid="65789"]

[jwplayer mediaid="65822"]