नाशिकमध्ये युतीला भगदाड

नाशिकमध्ये महायुती फुटली आहे. शिवसेना भाजपमधील नेत्यांच्या वादामुळे महायुतीत फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत होऊन शिवसेना-रिपाइं विरुद्ध भाजपचा सामना रंगणार, अशी चिन्हं दिसत आहेत.

Updated: Jan 26, 2012, 07:25 PM IST

www.24taas.com, नाशिक

नाशिकमध्ये महायुती फुटली आहे. शिवसेना भाजपमधील नेत्यांच्या वादामुळे महायुतीत फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत होऊन शिवसेना-रिपाइं विरुद्ध भाजपचा सामना रंगणार, अशी चिन्हं दिसत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून स्वबळावर नाशिकमध्ये लढण्याचा आग्रह स्थानिक नेत्यांनी आग्रह धरला होता. शिवसेनेबरोबर युती न करण्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होत. मात्र मुंबईतल्या नेत्यांनी सांगितल्यामुळे युतीवर पुन्हा चर्चा सुरू झाली होती. मात्र, आज झालेल्या बैठकीत आता भाजप सेनेबरोबर युती करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या ५ वर्षांत शिवसेना-भाजपमधला कारभार समाधानकारक नसून त्याचा फटका शिवसेनेबरोबरच भाजपलाही बसण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे ही युती होत नसल्याचं  भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुनगंटीवारांनी सांगितलं.

युती तुटल्यानंतरही रिपाइं मात्र शिवसेनेबरोबर राहाणार आहे. मात्र महायुतीमध्ये पडलेल्या या भगदाडामुळे आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेनेतील बरेच कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करत असल्यामुळे मनसेलाही महायुतीच्या फुटीचा फायदा होऊ शकतो.